....तर कायद्याची आठवण करून द्यावी लागणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

....तर कायद्याची आठवण करून द्यावी लागणार नाही
....तर कायद्याची आठवण करून द्यावी लागणार नाही

....तर कायद्याची आठवण करून द्यावी लागणार नाही

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat९p१६.jpg- KOP२३L८७९१६ आंबडवे: जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर.


तर कायद्याची गरज भासणार नाही

प्रा. सायली घाडगे ः आंबेडकर महाविद्यालयात महिला दिन साजरा

मंडणगड, ता. १० ः महिलेला जर एक व्यक्ती म्हणून स्वीकारले तरीही बरेचसे प्रश्न सुटतील. प्रत्येक वेळी महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची आठवण करून देण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन प्रा. सायली घाडगे यांनी केले.
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संयुक्त राष्ट्राची २०२३ सालच्या महिला दिनासाठी थीम ‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी आहे. जगभरात ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान व ऑनलाईन शिक्षणात जे योगदान देत आहेत, ते ओळखून त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा या थीमचा उद्देश आहे. महाविद्यालयातील महिला विकास मंचने याचे आयोजन केले होते. तृतीय वर्ष बीएमएस मधील विद्यार्थीनी चिन्मयी पावसकरने कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत आजच्या दिनाचे महत्व स्पष्ट केले.
राजेंद्र राऊत म्हणाले, ‘महिला दिनाची बीजे १९०८ च्या न्यूयॉर्क मधील कामगार चळवळीत रोवली गेली. क्लारा झेटकीन या महिलेने १९१० साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता १९७५ साली मिळाली.’ मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरीसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर आणि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर यांचे मार्गदर्शन लाभले.