
निहाली गद्रेचा प्रियदर्शनी भगिनी मंडाळातर्फे सत्कार
rat९३५.txt
बातमी क्र.३५ ( पान २)
rat९p३०.jpg -
८७९६६
संगमेश्वर ः महिला दिनी निहाली गद्रेचा सत्कार करताना
( छाया : मिनार झगडे , संगमेश्वर )
निहाली गद्रे यांचा सत्कार
संगमेश्वर,ता.९ः संगमेश्वर सारख्या छोट्याशा गावात राहून आपल्या गायनाची आवड जपत आणि संगीताचे क्लास घेत स्वतः संगीतातील अलंकार पदवी प्राप्त करणाऱ्या निहाली अभय गद्रे हिचा महिला दिनानिमित्त संगमेश्वर येथील प्रियदर्शनी भगिनी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला .
प्रियदर्शनी भगिनी मंडळातर्फे सत्कार करताना निहालीच्या सांगितिक प्रवासाचा आढावा घेऊन निहाली ही संगमेश्वरची शान असल्याचे नमूद करण्यात आले . संगमेश्वर येथे संगीतातील मोठी चळवळ नसताना देखील निहालीने आपली आवड जोपासली आणि या क्षेत्रात प्रगती केल्याबद्दल तिचे भगिनी मंडळातर्फे कौतुक करण्यात आले . निहालीला सांगितिक प्रवासासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आई दिप्ती आणि वडील अभय गद्रे यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढण्यात आले. यासह महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले .
यावेळी प्रियदर्शनी भगिनी मंडळाच्या समता कोळवणकर, माधवी भिडे, योगिता सैतवडेकर, शीतल भिंगार्डे, कुमुदिनी शेट्ये, नम्रता शेट्ये, दिप्ती गद्रे, चंदा शेरे, अपूर्वा शेरे, शुभांगी शेट्ये, प्रतिभा शेट्ये, मोहिनी भिंगार्डे, शिल्पा भिंगार्डे आदी उपस्थित होत्या .