
कोलगावात विविध स्पर्धांना प्रतिसाद
८७९८३
कोलगावात विविध स्पर्धांना प्रतिसाद
जागतिक महिला दिन; निरामय विकास केंद्राचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः निरामय विकास केंद्र, कोलगाव येथे सातेरी ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिलादिन पाककला स्पर्धा, विविध खेळ तसेच ज्येष्ठ महिला, ग्रामसंघाच्या चांगले काम करणाऱ्या पदाधिकारी यांचे सत्कार आदी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, कोलगाव सरपंच संतोष राऊळ उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्रामसंघाच्या महिलांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोलगावच्या ग्रामपंचायत सदस्य चव्हाण, माधुरी नाईक, मारिया डिमेलो, ग्रामसंघाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या वेळी मनोगत व्यक्त करताना अपर्णा कोठावळे यांनी, महिलांनी घरसंसार चालवताना स्वतःच्या पायावर उभे राहावे. यासाठी रोजगारातून प्रगती साधावी. कुटुंबाबरोबरच स्वतःसाठीही जगताना आरोग्य जपा, आनंदी रहा, असा मोलाचा सल्ला दिला. सरपंच राऊळ यांनी लवकरच कोलगावमध्ये महिला भवन उभारण्याचे आश्वासन दिले. पाककला स्पर्धेत (तांदळापासून गोड पदार्थ) कलेश्र्वर बचत समूह, कलेश्वर स्वयंसहायता बचत समूह, दुर्गा बचत समूह यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. या कार्यकमासाठी अध्यक्ष क्षितिजा धुरी, कोषाध्यक्ष रश्मी मोर्य, सचिव सपना गावडे, लिपिक सारिका चिकोडी, सीआरपी संजना जाधव, यांनी परिश्रम घेतले. सीआरपी रश्मी चिंदरकर, चैतन्य ग्राम संघ अध्यक्ष सविता कासार, सचिव दीपिका राऊळ, कोषाध्यक्ष अर्चना सावंत-भोसले, सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन, प्रास्ताविक पूनम नाईक यांनी केले.