Sun, April 2, 2023

संक्षिप्त
संक्षिप्त
Published on : 9 March 2023, 2:10 am
सोबत फोटो आहे.
- rat9p29.jpg-KOP23L87950 रत्नागिरी : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात महिला दिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत सहभागी महिला पालक व शिक्षिका.
आगाशे विद्यामंदिरात पाककला स्पर्धा
रत्नागिरी : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेला महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचिता माने (सॅन्डविच), द्वितीय गायत्री चव्हाण (मोकळ), तृतीय वर्षा बोडके (लाडू) यांनी यश मिळवले. तसेच उत्तेजनार्थ क्रमांक नुपूर पास्ते (राईस बॉल), गीता गोसावी (गोड पुरी) यांना मिळाला. या स्पर्धेत सहभागी पाककृतींचे परीक्षण सौ. समिता शेट्ये, सौ. अनुजा आगाशे यांनी केले.