
खारेपाटण शहरात पालख्यांने आगमन
kan95.jpg
88008
खारेपाटण : शिमगोत्सवानिमित्त खारेपाटण शहरात लगतच्या गावांतील देवतांच्या पालख्यांचे आगमन झाले आहे. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)
----------------
खारेपाटण शहरात पालख्यांने आगमन
खारेपाटण, ता. ९ : खारेपाटण शहरात लगतच्या दशक्रोशीतील देवतांच्या पालख्यांने आगमन सुरू झाले आहे. शहर आणि बाजारपेठेत पालखी नाचविण्याचा सोहळा रंगत आहे. तसेच होळी निमित्तच्या विविध कार्यक्रमांनी शहर दुमदुमून गेले आहे.
खारेपाटण शहरातील श्रीदेव काळभैरव हा ७२ खेड्यांचा अधीपती मानला जातो. या देवाच्या भेटीसाठी खारेपाटण परिसर तसेच राजापूर तालुक्यातील अनेक देवतांच्या पालख्या शिमगोत्सवात दाखल होतात. यात होळी पौर्णिमेपासून आतापर्यंत राजापूर तालुक्यातील गुंजवणे महाकाली, श्रीदेव गांगेश्वर, पन्हाळे निनादेवी तसेच कुरंगवणे येथील विठू महाकाली या ग्रामदेवतांच्या पालख्या शहरात दाखल झाल्या आहेत. श्रीदेव काळभैरवची भेट घेतल्यानंतर देव चव्हाटा येथील मांडावर भेटीचा कार्यक्रम रंगला. तसेच होळीच्या खांबाभोवती पालख्या नाचविण्याचाही कार्यक्रम रंगला होता.
शिमगोत्सवासाठी खारेपाटण दशक्रोशीमध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल झाल्याने बाजारपेठेतील वर्दळ वाढली आहे. तर पुढील काही दिवसांत आखणी पालख्या दाखल होणार असल्याने खारेपाटण शहरात उत्साहाचे वातावरण आहे.