
कुणबी समाजाचे शिष्टमंडळ मागासवर्ग आयोगाला भेटणार
rat०९४०.txt
बातमी क्र. ४० (पान ३ साठी)
कुणबी समाजाचे शिष्टमंडळ मागासवर्ग आयोगाकडे
पुणे येथे आज बैठक ः दाखले व जात पडताळणीसंदर्भात चर्चा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्ह्यात तिल्लोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले व जात पडताळणीसाठी पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाली आहे. याबाबत कुणबी समाजातील शिष्टमंडळ शुक्रवारी (ता. १०) राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना भेटणार आहे.
या शिष्टमंडळात कुणबी समाजाची संघाचे अध्यक्ष भूषणजी भूषण बरे, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, कुणबी युवा चे अध्यक्ष -माधव कांबळे, भास्कर चव्हाण, संभाजी काजरेकर, नंदकुमार मोहिते, सुवर्णाताई पाटील, कृष्णा वने आधी कुणबी समाजातील मान्यवर भेट घेणार आहेत. तिल्लोरी कुणबी समाजाची शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती मांडून जातीच्या दाखल्या बाबतचा घोळ कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. २३ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात मागासवर्गीय आयोगाचे सदस्य यांनी बैठक घेतली होती. तेव्हा मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी तोंडी आदेश दिल्याने तिलोरी कुणबी समाजाला जातीचा दाखला देणे बंद केले. जातीचे दाखले मिळणे बंद झाल्यामुळे जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दाखले द्या, असे तोंडी आदेश दिले. आता दाखले मिळत असले तरीही जात पडताळणी करणे फारच अडचणीचे झाले आहे.