
डेरवण क्रीडा संकुलात विविध
rat0941.TXT
बातमी क्र. 41 (पान 5 साठी)
फोटो
- rat9p36.jpg-
88006
डेरवण युथ गेम्स 2023 ला जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी एसव्हिजेसिटी क्रिडासंकुलाची माहिती घेताना सोबत प्रमुख विश्वस्त विकासराव वालावलकर, अजित गालवणकर, श्रीकांत पराडकर,गोडबोले व अन्य मान्यवर
डेरवण क्रीडा संकुलला पोलिस अधीक्षकांची भेट
खेड, ता. 9 : लहान वयात मुलांना डेरवण येथील क्रीडा संकुलात विविध खेळ खेळण्याची संधी मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मुले खेळण्याच्या उद्देशाने येतात. हे माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
‘डेरवण यूथ गेम्स 2023’ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाला रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते विविध खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी श्री विठ्ठलराव जोशी चँरीटीज ट्रस्ट च्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन क्रीडा संकुलाची पाहणी केली. यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त विकासराव वालावलकर, सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, मँनेजीग कमिटी मेंबर अजित गालवणकर, खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.