
देवबागमध्ये एकाची आत्महत्या
देवबागमध्ये एकाची आत्महत्या
मालवण : रंगकाम करणाऱ्या राकेशकुमार शिवराम (वय २३, मूळ रा. ता. हरिया, उत्तरप्रदेश) याने देवबाग-राऊळवाडी येथे राहत असलेल्या मांगरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेची खबर अच्युत मायबा यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. राकेशकुमार हा रंगकाम करायचा. देवबाग येथील पाटील यांच्याकडे तो सध्या काम करत होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष शिवगण करीत आहेत.
.............
नांदरुखच्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू
मालवण: नांदरुख-कुर्ले भाटलेवाडी येथील दीपेश लहूराज चव्हाण (वय ३४) या तरुणाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दीपेश याला दारूचे व्यसन होते. त्याच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्याची मामी नम्रता गावडे यांना तो जनरल वॉर्डमधील खाटीखाली झोपलेला दिसला. गावडे यांनी या घटनेची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी दीपेशचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी हेमंत पेडणेकर करत आहेत.
.................