देवगडमध्ये १५ ला पर्यटन व्यावसायिक मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये १५ ला पर्यटन व्यावसायिक मेळावा
देवगडमध्ये १५ ला पर्यटन व्यावसायिक मेळावा

देवगडमध्ये १५ ला पर्यटन व्यावसायिक मेळावा

sakal_logo
By

88127
देवगड ः येथे नितीन वाळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाजूला बँकेचे अधिकारी आणि इतर. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडमध्ये १५ ला पर्यटन व्यावसायिक मेळावा

नितीन वाळके; बँकेच्या योजनांची माहिती देणार

देवगड, ता. १० ः जिल्हाभरातील स्थानिक पातळीवरील पर्यटन वृद्धीसाठी बँकेच्या योजनांची माहिती देण्याच्या अनुषंगाने १५ मार्चला सकाळी दहा ते एक दरम्यान देवगडात जिल्हाभरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न असलेल्या पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा घेण्यात येणार आहेत. यावेळी विविध मान्यवर स्थानिक व्यावसायिकांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव नितीन वाळके यांनी येथे पत्रकारांना दिली.
जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना नव्याने संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने बँक अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी यांची येथे संयुक्त बैठक झाली. बैठकीनंतर श्री. वाळके पत्रकारांशी बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे सहसचिव नंदन वेंगुर्लेकर, अस्मिता मीना जयेंद्र (वराड -मालवण), देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, बँक ऑफ इंडिया देवगड शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन बंबानी, बँक ऑफ इंडियाचे कृषि अधिकारी नितीन धसाळ, मधुकर नलावडे, दिग्विजय कोळंबकर, लहरीकांत पटेल, वैभव बिडये, मिलिंद कुबल आदी उपस्थित होते.
श्री. वाळके म्हणाले, ‘‘जिल्हाभरातील पर्यटन वृद्धीसाठी निवास न्याहारीसह पर्यटन उद्योग विस्तारण्याचा मानस आहे. याची सुरूवात देवगड येथून होत आहे. यासाठी १५ मार्चला प्रातिनिधीक स्वरूपात मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. यावेळी बँक ऑफ इंडियाचे रत्नागिरी विभागीय कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक संतोष सावंत -देसाई, कोकण विभागाचे विभागीय संचालक हनुमंत हेडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सिंधुदुर्गचे वरिष्ठ प्रादेशीक व्यवस्थापक संजय ढेकणे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाभरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न असलेले व्यावसायिक यावेळी उपस्थित राहतील. नव्याने निवास न्याहारी उभारणाऱ्यांना यावेळी आर्थिक योजनांचा माहिती बँकाकडून देण्यात येईल. याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे नोंद असलेले निवास न्याहारी व्यावसायिक, बचतगटाचे प्रतिनिधी, हॉटेल आणि खानावळ व्यावसायिक, पर्यटकांना वाहन उपलब्ध करून देणारे व्यावसायिक, साहसी पर्यटन व्यावासायिकांचीही उपस्थिती असेल.’’
.................
चौकट
पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न
देवगडमधील मेळाव्यात पर्यटन वृद्धीच्या अनुषंगाने विचार विनिमय केला जाणार आहे. प्रातिनिधीक स्वरूपात देवगडमध्ये मेळावा होणार असला तरी जिल्ह्याच्या विविध भागात यापुढच्या काळात चर्चासत्र आणि मार्गदर्शन मेळावे होतील. यातून जिल्ह्यातील पर्यटन वृध्दीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे नितीन वाळके यांनी यावेळी सांगितले.