
शिवाजी वाचनालयातर्फे महिलांचा सत्कार
88131
मालवण ः येथील शिवाजी वाचन मंदिरच्यावतीने मेधा गोगटे व संस्कृती बांधकर यांचा सन्मान करण्यात आला.
शिवाजी वाचनालयातर्फे महिलांचा सत्कार
मालवण ः महिला दिनाचे औचित्य साधून भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. वाचन मंदिरच्या नव्या इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात रेवतळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मेधा गोगटे- देशमुख यांचा ज्येष्ठ शिक्षिका संध्या पाटकर यांच्या हस्ते तर शिशुविहार -काळे आजींची बालवाडीच्या मुख्य शिक्षिका संस्कृती (कमल) बांदकर यांचा अक्षता बांदेकर यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यांना स्मृतिचिन्ह व शिवाजी वाचन मंदिर शतकोत्सव स्मरणिका देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवाजी वाचन मंदिरच्या अध्यक्षा मेधा शेवडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, कार्यवाह वैदेही जुवाटकर, सदस्य बबन परुळेकर, हेमा परुळेकर, श्रीधर काळे, सचिन बांदकर, बाळू काजरेकर, प्रिया दुदवडकर, शांभवी कोळगे, निशा बिडये, प्रज्ञा राणे, शर्वरी घाडी, नंदिनी गावकर आदी उपस्थित होते.
------------
सावंतवाडीत १७ पासून क्रिकेट स्पर्धा
सावंतवाडी ः येथील ब्लु स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे शहरात प्रथमच (एससी प्रवर्गातील खेळाडूंसाठी) १७ ते १९ मार्च दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक खुल्या एक गाव एक संघ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा येथील जिमखाना मैदान, स्वार हॉस्पिटल समोरील मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत केवळ मागासवर्गीय (एससी) समाजातील खेळाडूंना प्रवेश असून एका गावच्या एकाच संघास प्रवेश देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक, मालिकावीर अशी इतर पारितोषिकेही आहेत. या स्पर्धेची प्रवेश फी २ हजार रुपये आहे. प्रथम येणाऱ्या १६ संघानाच प्रवेश देण्यात येणार असून १२ मार्चपर्यंत प्रशांत पाटणकर, अमन अनावकर, अमर जाधव, निखिल कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.