स्ट्री स्ट्रीट लाईट सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्ट्री
स्ट्रीट लाईट सुरू करा
स्ट्री स्ट्रीट लाईट सुरू करा

स्ट्री स्ट्रीट लाईट सुरू करा

sakal_logo
By

rat१०१४.txt

बातमी क्र. १४ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त)

राजापुरातील बंद स्ट्रीट लाईट सुरू करा

राजापूर ः शहरातील तालिमखाना ते जवाहरचौक मुख्य रस्ता आणि कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगणपर्यत चिंचबांध परिसर या भागातील बऱ्‍याच ठिकाणचे स्ट्रीट लाईट गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे लोकांना काळोखातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली.
नागरिकांना रात्रीच्यावेळी सुरक्षितपणे फिरता यावे यासाठी शहरातील विविध भागांमधील रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहेत. यापैकी तालिमखाना ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यासह कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगणपर्यत चिंचबांध परिसर या भागातील स्ट्रीट लाईट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बंद आहेत. त्यामुळे लोकांना काही भागात काळोखातून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिमगोत्सवाला सुरूवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक ग्रामदेवतांच्या पालख्या आणि खेळे शहरात येत आहेत. शहरातील काही भागांमध्ये बिबट्याचाही वावर आहे. त्यामुळे बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करावेत अशी मागणी अ‍ॅड. खलिफे यांनी पालिकेकडे केली आहे.
--
पावसमधील शौचालयाला मिळाले पाणी

पावस ः केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पावस बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयामध्ये अखेर पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्षे पावस बस स्थानकामध्ये शौचालयाची दूरवस्था झाली होती. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन लाख साठ हजाराचा स्वच्छ भारत अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून दिला आणि शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. अखेर उपसरपंच प्रवीण शिंदे यांनी अडचण लक्षात घेऊन तातडीने पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे प्रवासी व व्यापारी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
--
पाककला स्पर्धेत झिनत खामसे प्रथम

दाभोळ ः जेसीआय दापोली यांच्यातर्फे अबोली सप्ताहानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेला दापोलीतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थ अशी संकल्पना देण्यात आली होती. यामध्ये स्पर्धकांनी सहभाग नोंदवताना विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ प्रदर्शित केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक झिनत खामसे यांच्या ज्वारी खीर मूस, द्वितीय क्रमांक गिरिजा भाटकर यांच्या चटपटी कोथ्यु रोटी तर तृतीय वैष्णवी कदम यांच्या ज्वारी संत्रा केक या पदार्थांना देण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका साधना बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी असे विविध उपक्रम समाजामध्ये राबवले जात आहेत. महिलावर्ग, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये सारख्या आस्थापना नेहमीच असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यामुळे स्त्रियांना वेगळी ताकद मिळते आहे. जेसीआय दापोलीने आयोजित केलेल्या या अबोली सप्ताहाचे बोत्रे यांनी कौतुक केले. या अबोली सप्ताहात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी विविध प्रशिक्षणे, मिनी मॅरेथॉन स्पर्धा, पाककला स्पर्धा इत्यादींचे आयोजन केलेले आहे.