खेर्डीतील महिला मेळाव्यात व्यावसायिकतेचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेर्डीतील महिला मेळाव्यात व्यावसायिकतेचे धडे
खेर्डीतील महिला मेळाव्यात व्यावसायिकतेचे धडे

खेर्डीतील महिला मेळाव्यात व्यावसायिकतेचे धडे

sakal_logo
By

rat१०८.txt

बातमी क्र..८ (टुडे पान २ साठी)

खेर्डीतील मेळाव्यात व्यावसायिकतेचे धडे

चिपळूण, ता. १० ः स्पर्धेच्या युगात महिलांनी विविध व्यवसाय सुरू करावेत. महिलांनी विविध व्यवसायाची कास धरावी. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली खेर्डी येथे महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. या वेळी महिलांना विविध शासकीय योजनांच्या माहितीसह व्यावसायिकतेचे धडे देण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खेर्डी वरचीपेठ येथील संस्कृती मंगल कार्यालयात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात मार्गदर्शक प्रसाद जोग व उमेदचे अमोल काटकर यांनी मार्गदर्शन केले. घरबसल्या महिला छोटेखानी विविध व्यवसाय, उद्योग सुरू करू शकतात. सुरवातीला कदाचित काहीशा अडचणी जाणवतील; मात्र त्यावर त्वरित मार्ग निघतो. यासाठी महिलांनी खंबीर मनाने व्यवसायात उतरायला हवे, असे आवाहन प्रसाद जोग यांनी केले. उमेदचे काटकर यांनी महिला सक्षमीकरणासाठी तसेच महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजना सांगितल्या.
माजी सभापती पूजा निकम म्हणाल्या, आज महिला विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. महिला कुटुंबाचा गाडा खंबीरपणे हाकतात. त्यासाठी महिलांनी रोजगाराची साधने उपलब्ध होण्यासाठी विविध व्यवसायाची कास धरावी. त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण व बाजारपेठांची माहिती देण्यात येईल. मेळाव्यास राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा दीपिका कोतवडेकर, खेर्डी ग्रामपंचायत सदस्या प्रणाली दाभोळकर, ओवी शेट्ये, रशिदा चौगुले, अर्चना ठसाळे यांच्यासह बचतगट ग्रामसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.