
धाकोरेत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव
88362
धाकोरा ः महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीने महिलांचा गौरव करण्यात आला.
धाकोरेत विविध क्षेत्रातील
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
सावंतवाडी, ता. ११ ः महिला दिनाचे औचित्य साधत शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ आणि मुख्याध्यापक धाकोरे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम पार पडले.
यात धाकोरे येथील नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचा सत्कार करण्यात आला. धाकोरा जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी डॉ. प्रियांका गोवेकर हिचा गावातील प्रथम महिला डॉक्टर झाल्याबद्दल तसेच बीएएमएस पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, शाळा व्यवस्थापन कमिटी उपाध्यक्ष नितीन मुळीक, माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य पूजा कोठावळे, भारती मुळीक, अपर्णा प्रभुराळकर, मुख्य गटप्रवर्तक अपर्णा राळकर, माता-पालक संघ अध्यक्ष सौ. मुळीक, बाबूराव गोवेकर, रश्मी गोवेकर, अंगणवाडी सेविका मनाली साटेलकर, माजी अंगणवाडी सेविका प्रेमा राणे, मुख्याध्यापक दिलीप जाधव, शिक्षिका सौ. कांबळी तसेच आजगाव व धाकोरा ग्रामस्थ उपस्थित होते. उपाध्यक्ष नितीन मुळीक यांच्या हस्ते डॉ. प्रियांका गोवेकर यांना गौरविण्यात आले. मुख्याध्यापक जाधव यांनी आभार मानले.