
-देसाई हायस्कूलचे राखेतून उडाला मोर रंगतदार
rat१११९. txt
फोटो ओळी
-rat११p५.jpg ः
८८३२१
जळगाव ः बालनाट्य स्पर्धेत जळगाव येथे अंतिम फेरीतील येथील देसाई हायस्कूलचे राखेतून उडाला मोर या बालनाट्यातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
--
देसाई हायस्कूलचा ‘राखेतून उडाला मोर’ रंगतदार
राज्य बालनाट्य स्पर्धा ः जळगावमध्ये अंतिम फेरीत सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथील केंद्रावर झालेल्या १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धा झाली. स्पर्धेत येथील अ. के. देसाई हायस्कूलचे डॉ. साळुंखे लिखित व शिक्षक संतोष गार्डी दिग्दर्शित राखेतून उडाला मोर या बालनाट्याचे सादरीकरण झाले. एका दुर्गम भागात स्मशानभूमीत राहणाऱ्या या मुलांचा शिक्षणाचा ध्यास अभिनयातून साकारणाऱ्या मुलांनी रंगतदार केला.
या नाटकाने कोल्हापूर येथील प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांक पटकावून अंतिम नाट्यस्पर्धेत प्रवेश केला होता. या बालनाट्यासाठी दिग्दर्शन द्वितीय व अभिनय गुणवत्ता पारितोषिके पटकावली. अंतिम फेरी जळगाव येथे ७ ते १० मार्च या कालावधीत झाली. अंतिम फेरीत २३ बालनाट्यांचे सादरीकरण झाले. अ. के. देसाई हायस्कूलने ९ मार्चला सायंकाळी राखेतून उडाला मोर या बालनाट्याचा सादरीकरण केले. एका दुर्गम भागातील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असलेल्या मुलांची ही कथा या बालनाट्यातून साकारली.
स्मशानभूमी परिसरात झोपडी बांधून राहाणारं कुटुंब. त्यांचा उदरनिर्वाह फक्त मृतदेहासाठी आणलेल्या अन्नातूनच होत असतो. मृतदेह जाळण्याच्या नवीन पद्धतीमुळे त्यांना अन्न मिळणेही शक्य होत नाही; पण त्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची ओढ, श्रीमंत मुलांकडून होणारा अपमान अशा गोष्टींमुळे शिक्षण घेण्याऱ्या मुलांची जिद्द कमी करत असतात; मात्र मुलांचा ध्यास आणि त्यानंतर शासनाने केलेले प्रयत्न या दुर्गम भागातील अत्यंत गरीब मुलांना शिक्षणात पुढे जाण्याचे संकेत मिळतात, अशी कथा या नाटकातून अधोरेखित केली आहे.
देसाई हायस्कूलचे मुख्यध्यापक प्रमोद शेखर यांच्या निर्मितीतून तयार झालेल्या या बालनाट्यात तनया लिंगायत, अर्थव गोणबरे, भावेश खरात, सुखदा गावकर, रितू आखाडे, अमन जाधव, प्राजक्ता लवंदे, अनिल थापा, विकास देवांगण, महेक मुल्ला, पार्थ जांभळे, गणेश थापा, स्वरुप आडविलकर, शैलेश धावडे, सोहम मोहिते या मुलांनी अभिनयाची चुणूक दाखवून रसिकांची मने जिंकली. या नाटकाला पार्श्वसंगीत निखिल भुते, प्रकाशयोजना यश सुर्वे, नेपथ्य प्रवीण धुमक, दत्ताराम घडशी, रंगभूषा नरेश पांचाळ, वेशभूषा अंजली पिलणकर यांनी सांभाळली. माजी विद्यार्थी दुर्वेश सागवेकर, व्यास गावंड, अक्षय सावंत, सानिका वाडेकर, अलिशा जाधव यांनी साहाय्य केले.