रामगड किल्ल्यावर फडकला भगवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामगड किल्ल्यावर फडकला भगवा
रामगड किल्ल्यावर फडकला भगवा

रामगड किल्ल्यावर फडकला भगवा

sakal_logo
By

88432
मालवण ः रामगड येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


रामगड किल्ल्यावर फडकला भगवा

शिवजयंती उत्साहात; वास्तुफलकासह मुख्य दरवाजाचे अनावरण

आचरा, ता. ११ : रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी रामगडावर वास्तुफलक आणि भगवा झेंडा फडकावण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रामगड ग्रामस्थ भालचंद्र पवार यांच्या हस्ते गडपूजनाने झाली. तद्‌नंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते मुख्य दरवाजा आणि पश्चिमेकडील बुरुजावर हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेल्या भगव्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी प्रगत विद्यामंदिर रामगडच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती उत्स्फूर्त होती. उपस्थित सर्वांना संपूर्ण गडफेरी करत गड दाखविण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या संवर्धन कार्याची माहिती देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मुख्य कार्यक्रम गणेश मंदिरात झाला. या वेळी रामगड सरपंच शुभम मठकर यांच्या हस्ते गणेशाचे तसेच शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी आपदा मित्र टीमचे वैभव खोबरेकर, प्रज्ञा बागवे, तनुजा गोलतकर तसेच सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांनी ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तहसीलदार पाटील यांनी आपल्या मनोगतात दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रामगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त देव्हाऱ्यात बसवून देव करण्यापेक्षा मनुष्यरुपातील या युगपुरुषाने आपल्या कार्यातून कसे देवत्व प्राप्त केले, याचा प्रत्येकाने अभ्यास करत खऱ्या अर्थाने शिवविचार दैनंदिन व्यवहारात आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना लेखक गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप केले.
या कार्यक्रमासाठी मंडल अधिकारी सुनील पवार, उपसरपंच राजू जाधव, मोहन घाडीगावकर, बंडू लाड, अमित फोंडके, रामगड हायस्कूलचे दिनेश सावंत, माजी सैनिक दत्तगुरू गावकर, महादेव घाडीगावकर, अनिल राऊळ, पूर्वा राणे, धनश्री अडसूळ, महेश्वरी कुवळेकर, देवेंद्र घाडीगावकर, देशमुख, सह्याद्री प्रतिष्ठाचे प्रकाश सावंत, योगेश संकपाळ, ऐश्वर्या घाडीगावकर, मयूर बोंद्रे, दुर्गवीर प्रतिष्ठानचे रवींद्र रावराणे, प्रशांत वाघरे, प्रभाकर परब आदी उपस्थित होते.