अमरावतीच्या टीमकडून बापर्डेची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावतीच्या टीमकडून बापर्डेची पाहणी
अमरावतीच्या टीमकडून बापर्डेची पाहणी

अमरावतीच्या टीमकडून बापर्डेची पाहणी

sakal_logo
By

88463
बापर्डे : गावाला अमरावती टीमने भेट देत पाहणी केली. यावेळी सरपंच संजय लाड व अन्य.


अमरावतीच्या टीमकडून बापर्डेची पाहणी

स्वच्छतेची दखल; आतापर्यंत केलेल्या कामांचा अभ्यास

ओरोस, ता. ११ ः संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मूल्यमापन झालेल्या बापर्डे गावाला अमरावती जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक अशा ३० सदस्यांच्या टीमने भेट देत पाहणी केली. अमरावती जिल्ह्यात बापर्डे गावाने केलेल्या कामांचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता.
यावेळी बापर्डे गावचे सरपंच संजय लाड, ग्रामपंचायत सदस्य अतुल राणे, रुपेश मोडकर, ज्योती नाईकधुरे, सोसायटी चेअरमन अजित राणे, संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. बापर्डे ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी मनोगत मांडताना बापर्डे गावाने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. गावाने केलेल्या कामाचे कोणत्या प्रकारे नियोजन केले, यासाठी ग्रामस्थांनी याबाबतीत कोणत्या प्रकारचे सहकार्य केले, याबाबत माहिती दिली. डॉ. सुहास राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सुरू असलेल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालयाबाबत सविस्तर विवेचन केले. डॉ. राणे यांच्याच प्रयत्नातून डॉ. सुधा मूर्ती तसेच डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा शाळेतील मुलांनी गावाला दिलेली भेट आमच्या या गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी आहे, असे ग्रामसेवक राठोड यांनी यावेळी सांगितले. तसेच गावाला भास्करराव पेरेपाटील यासारख्या मान्यवरांच्या भेटी होत असल्याचे सांगितले. सरपंच लाड यांनी आभार मानले.