शालेय समिती व संस्थेच्या सहमतीने सकाळी शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय समिती व संस्थेच्या सहमतीने सकाळी शाळा
शालेय समिती व संस्थेच्या सहमतीने सकाळी शाळा

शालेय समिती व संस्थेच्या सहमतीने सकाळी शाळा

sakal_logo
By

शालेय समिती, संस्थेच्या
सहमतीने सकाळी शाळा
रत्नागिरी, ता. १२ ः उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेऊन शालेय समिती व संस्थेच्या सहमतीने शाळा सकाळ सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिल्या आहेत. दुपारी उष्मा वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वाढता उन्हाळा, पाणीटंचाई, दहावी आणि बारावी परीक्षा यामुळे शाळा सकाळ सत्रात भरवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकडुन माध्यमिक शिक्षण विभागाला पत्र सादर करण्यात आली होती. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी शालेय समिती व संस्थेच्या सहमतीने शाळा सकाळ सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम १९८६ मधील नियम ५४.२ नुसार शाळा सकाळ सत्रात भरवल्याने शालेय कामकाजाचे दिवस व शालेय तासिका कमी होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सकाळ सत्रात शाळा भरवल्यास त्याची माहिती उलट टपाली या कार्यालयास सादर करावी, असेही शिक्षणाधिकारी सावंत यांनी सांगितले आहे.