‘जोगेश्वरी मंडळ’ची फुगडी स्पर्धेत बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जोगेश्वरी मंडळ’ची फुगडी स्पर्धेत बाजी
‘जोगेश्वरी मंडळ’ची फुगडी स्पर्धेत बाजी

‘जोगेश्वरी मंडळ’ची फुगडी स्पर्धेत बाजी

sakal_logo
By

88578
पणदूर ः फुगडी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देताना भूषण तेजम. सोबत प्राची राणे व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘जोगेश्वरी मंडळ’ची फुगडी स्पर्धेत बाजी

पणदूरमध्ये आयोजन; मानसी गोसावी पैठणीच्या मानकरी

कुडाळ, ता. १२ ः ग्रामपंचायत कार्यालय पणदूर येथे आयोजित केलेल्या फुगडी स्पर्धेत श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ-भैरववाडी यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर पैठणीची मानकरी मानसी गोसावी ठरल्या.
ग्रामपंचायत कार्यालय पणदूर येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पल्लवी पणदूरकर, सहा. निबंधक सह. संस्था कुडाळ उर्मिला यादव, प्रमुख पाहुणे पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, माजी सरपंच दादा साईल, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत साईल, माजी सरपंच शिवराम पणदूरकर, माजी सरपंच शामसुंदर सावंत, अनंत टंगसाळी, धोंडी साईल, श्रीमती आठले, श्रीमती पठाडे रुची राऊळ, साबाजी सावंत, संजय सावंत, बापुजी सावंत, ग्रामपंचायत उपसरपंच साबाजी मस्के, ऐश्वर्या टंगसाळी, अपर्णा साईल, उल्हास पणदूरकर, संगिता साईल, महादेव सावंत, किशोरी जाधव, मुख्याध्यापिका दिपश्री परब, शिक्षिका संगिता राऊळ, पोलिसपाटील देऊ सावंत, ग्रामसेवक सपना मसगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात होतकरु महिला आशा सेविका निकिता कमलाकर-साळंखे यांचा सत्कार झाला. यावेळी महिलांसाठी अनेक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पाककला स्पर्धेचा अनुक्रमे निकाल ः सिद्धिका बागायतकर, ज्योती गोसावी, रसिका गोसावी, निशा चोरगे, पार्वती पणदूरकर. पैठणी स्पर्धा ः मानसी गोसावी, भाग्यश्री पणदूरकर, जुई शेर्लेकर. फुगडी स्पर्धा ः श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ-भैरववाडी, सखी फुगडी संघ पावशी, पाटेकर फुगडी संघ, पणदूर- सावंतवाडा. ग्रामपंचायतच्यावतीने आरोग्य मेळावा घेण्यात आला. याचे उद्‍घाटन प्रा. उपकेंद्र डॉ. माळी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गंगावणे, डॉ. सावंत, आरोग्य सेवक एस. पी. धामणकर, आरोग्य सेविका व्ही. आर. धर्णे, एम. एन. गोसावी, आर. पी. चव्हाण उपस्थित होते.