खेड-वीस धनगरवाड्यांना ''डोली''चाच आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-वीस धनगरवाड्यांना ''डोली''चाच आधार
खेड-वीस धनगरवाड्यांना ''डोली''चाच आधार

खेड-वीस धनगरवाड्यांना ''डोली''चाच आधार

sakal_logo
By

वीस धनगरवाड्यांना ''डोली''चाच आधार
शासनाकडून पदरी निराशाच ; रस्ता नसल्याने रुग्णांची हेळसांड
खेड, ता. १२ : तालुक्यातील धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्त्यांच्या मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. तालुक्यातील २० धनगरवाड्यांतील रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी ''डोली''चाच आधार घ्यावा लागत आहे. यामुळे रुग्णांची हेळसांडच सुरू आहे.
शासन दरबारी खेटे घालूनही ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पडत आहे. धनगरवाड्यांमध्ये विकासाची पहाट नेमकी उजाडणार तरी कधी? असा प्रश्न धनगरवाड्यांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीत मुख्य गावापासून ४ ते ५ किमी अंतरावर बहुतांश धनगरवाड्या वसलेल्या आहेत. तालुक्यातील धनगरवाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्त्यांचा थांगपत्ताच नसल्याने ग्रामस्थांना रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी डोलीचाच आधार घ्यावा लागत आहे. हे विदारक चित्र वर्षानुवर्षे धनगरवाड्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. तालुक्यात अनेक सामाजिक संघटना धनगरवाड्यांच्या विकासासाठी झटत आहेत. यासाठी लोकप्रतिनिर्धीसह शासन दरबारी खेटे घालूनही पदरी मात्र निराशाच पडत आहे. या धनगरवाड्यांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा असून ग्रामस्थांना अडचणींना समोर जावे लागत आहे. रस्त्यांचाही थांगपत्ताच नसल्याने ग्रामस्थांची परवड सुरू आहे. मिर्ले-धनगरवाडी, मालदे- जानकरवाडी, अस्तान हुंबरवणे धनगरवाडी, किंजळे, धनगरवाडी, चाटव- धवडे-धनगरवाडी, धनगरवाडी, आंबवली-भिंगारा- धनगरवाडी, शेल्डी-धनगरवाडी, खोपी-कुपरे धनगरवाडी, खोपी- अवकिरे धनगरवाडी, नांदिवली- आखाडेवाडी, घेरारसाळगड-भुतराई मौजे जैतापूर-धनगरवाडी नं. १ व २, बिजघर-धनगरवाडी, कासई- धनगरवाडी, चिरणी-धनगरवाडी, ढेबेवाडी,कावळे- केळणे- धनगरवाडी, , वावे तर्फे नातू -धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी या गाव-वाड्यांमध्ये ग्रामस्थांना रस्त्यांअभावी दवाखान्यात जाण्यासाठी डोलीचा वापर करावा लागत आहे.