निबंध स्पर्धेत अनन्या रेवाळे, ऋतुजा चाळके प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निबंध स्पर्धेत अनन्या रेवाळे, ऋतुजा चाळके प्रथम
निबंध स्पर्धेत अनन्या रेवाळे, ऋतुजा चाळके प्रथम

निबंध स्पर्धेत अनन्या रेवाळे, ऋतुजा चाळके प्रथम

sakal_logo
By

rat१३१८.txt

बातमी क्र.. १८ (टुडे पान ३ साठी)

निबंध स्पर्धेत रेवाळे, चाळके प्रथम

इंडियन रेडक्रॉस सोसायटी; रक्तदान अमृत महोत्सवी कार्यक्रम

रत्नागिरी, ता. १३ ः इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रत्नागिरी शाखेने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शालेय गटातून खेडशी हायस्कूलच्या अनन्या रेवाळे हिने तर खुल्या गटातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ऋतुजा चाळके हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटीमार्फत नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान रक्तदान अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने इंडियन रेडक्रॉसच्या रत्नागिरी शाखेने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. शालेय गट (आठवी ते बारावी) आणि खुला गट अशा दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शालेय गटासाठी आजच्या युगातील रक्तदानाचे महत्व किंवा फास्टफुडचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तर खुल्या गटासाठी रक्तदान-समज आणि गैरसमज किंवा इंडियन रेडक्रॉस सोसायटीची कार्यप्रणाली असे विषय देण्यात आले होते. शालेय गटातून गोगटे कॉलेजची कस्तुरी आंब्रे हिने द्वितीय तर हातखंबा ज्युनियर कॉलेजची मंजिरी गुरव हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. खुल्या गटातून गोगटे कॉलेजचे साहील कदम यांनी द्वितीय तर बंदररोड पर्णिका मुळ्ये यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी रु. ७५० व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ५०० रुपये व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांकासाठी २५० रु. आणि प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी रेडक्रॉसच्या मानद सचिव वीणा सामंत यांच्या नेतृत्वाखाली अरुण मुळ्ये, चंद्रमोहन देसाई यांनी सुव्यवस्थितपणे पार पाडली.