आंबोलीत सात दिवसीय शिमगोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोलीत सात दिवसीय शिमगोत्सव उत्साहात
आंबोलीत सात दिवसीय शिमगोत्सव उत्साहात

आंबोलीत सात दिवसीय शिमगोत्सव उत्साहात

sakal_logo
By

swt133.jpg
88762
आंबोलीः राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील कलाकार आणि ग्रामस्थ.

आंबोलीत सात दिवसीय
शिमगोत्सव उत्साहात
आंबोली, ता. १३ : येथील सात दिवसांचा शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राधा-कृष्णाची प्रेमलीला, पेंड्या आणि गोपिका, सवंगड्यांचा खेळ दाखवत शिमगोत्सवात राधानृत्य घरोघरी फिरविण्याची प्रथा तळकोकणात जोपासली जाते. येथील फौजदारवाडीतील युवक व ग्रामस्थांनी देखील ही प्रथा जोपासली आहे. घरोघरी राधानृत्य, पेंड्या आणि सवंगड्यांचा खेळ गौळणीच्या तालावर घरोघरी सादर करण्यात आला. यामध्ये कृष्णा-अभिषेक, राधा-मयुरेश यांसह यश राऊत, चैतन्य गावडे, प्रथमेश गावडे, नारायण सावंत, महेश गावडे, झिपा सावंत, पांडुरंग गावडे, कल्पेश गावडे, उत्तम गावडे, सूरज राऊत, सूरज गावडे, शैलेश गावडे, किशोर गावडे, विद्यासागर गावडे, अरुण गावडे, सुनील गावडे, प्रवीण राऊत, चंद्रकांत राऊत, विजय गावडे, ज्ञानेश्वर गावडे, रोहन गावडे, उमेश गावडे, अरुण गावडे, विठ्ठल गावडे, गुणाजी गावडे, गजानन गावडे, संजय परब यांनी सहभाग घेतला.
.................
सेवानिवृत्त शिक्षकांचा संपामध्ये सहभाग
कुडाळः राज्य सरकार न्यायालय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचे अस्थिर धोरण अनेक दुर्लक्षित प्रश्न, सेवानिवृत्तीची प्रलंबित आर्थिक देयके, ७७-७८ संपाची परिवर्तन स्थिती या पार्श्वभूमीवर ''हम सब एक है'' ची आरोळी देत उद्या (ता. १४) होणाऱ्या संपात सिंधुदुर्ग सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन सहभागी होणार असल्याचे पत्रकात अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी म्हटले आहे.
..............