
लघु नळ योजनेचा मळगावात शुभारंभ
swt137.jpg
88766
मळगावः येथे लघु नळ योजना कामाचा प्रारंभ करताना सरपंच स्नेहल जामदार.
लघु नळ योजनेचा
मळगावात शुभारंभ
सावंतवाडीः मळगांव-लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना कामाचा शुभारंभ सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यासाठी एकूण एक कोटी रुपये प्रस्तावित असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या निकिता बुगडे, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भाजप शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ उर्फ बाळा बुगडे, निरवडे गावचे माजी सदस्य नागेश उर्फ दादा गावडे, मळगाव ग्राम स्वच्छता कमिटी अध्यक्ष गुरुनाथ गावकर, तात्या लातये, श्रीधर गावकर, तात्या राऊळ, सुभाष लातये, बाळा गावकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
...............
कणकवलीत गायन स्पर्धा
कणकवलीः येथील रोटरी क्लबतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर मैदानावर ‘रोटरी आनंद मेळा’ सुरु आहे. याअंतर्गत २० मार्चला ‘मेरी आवाज सुनो’ या गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा बाल गट, किशोरवयीन गट, खुला गट या गटांमध्ये पार पडणार आहे. याशिवाय दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. गायन स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मेघा गांगण, भेराराम राठोड, सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्याशी संपर्क साधावा.