
चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
दादा इदातेंचा उद्या नागरी सत्कार
चिपळूण ः येथील रिगल एज्युकेशन सोसायटीतर्फे कर्मवीर, पद्मश्री दादा इदाते यांचा १५ मार्चला नागरी सत्कार आयोजित केला आहे. कोंढे रिगल हॉल येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दादा इदाते यांनी सामाजिक कार्यात क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन समस्त चिपळूणवासीयांतर्फे हा नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला रा. स्व. संघ रत्नागिरीचे संघचालक राजन दळी, रा.स्व. सं. जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष गंगाराम इदाते, रिगल संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका सुमिता शिर्के उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो ओळी
-rat१३p९.jpg- KOP२३L८८७४४ मिलिंद टिकेकर
------
रत्नागिरीत उद्या
मधुमिलिंद स्मृतीमैफल
रत्नागिरी ः येथील सुप्रसिद्ध नाट्यकर्मी, तबलावादक आणि शिक्षक (कै.) मिलिंद टिकेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मधुमिलिंद स्मृतीमैफलीचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. १५) सायंकाळी ६.३० ते ९ या वेळेत झाडगाव, शेरेनाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात मैफल रंगणार आहे. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. संगीत हा ज्यांचा श्वास होता आणि नाटक हा ज्यांचा प्राण होता. ते मिलिंद टिकेकर आयुष्यभर कलोपासना करत राहिले. शाळेतील विद्यार्थी घडवण्याबरोबरच अनेक कलाकार घडवण्याचे कामही यांनी अत्यंत जिव्हाळ्याने केले. १५ मार्च २०२१ ला त्यांनी जीवनाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली. वेगळेपणा हा टिकेकर यांचा स्थायीभाव होता. म्हणूनच हा वेगळेपणा जपण्यासाठी या मैफलीची संकल्पना ही अनवट नाट्यगीते अशी ठेवण्यात आली आहे. या मैफलीसाठी स्वप्नील गोरे (सावंतवाडी), विशारद गुरव (चिपळूण), श्वेता जोगळेकर आणि आसावरी परांजपे (रत्नागिरी) हे गायक कलाकार आहेत. कार्यक्रमाला ऑर्गनसाथ विलास हर्षे, तबला हेरंब जोगळेकर, हार्मोनियम श्रीरंग जोगळेकर, व्हायोलिन उदय गोखले करणार असून निवेदन पूर्वा खालगावकर करणार आहेत.
सलोनी शिर्केला कास्यपदक
खेड ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट अर्थात एसव्हीजेसीटीतर्फे डेरवण येथे सुरू असलेल्या डेरवण युथ गेम्स २०२३ मधील ( डीवायजी) योगासन स्पर्धेवर इचलकरंजीच्या खेळाडूंचा ठसा दिसून आला. या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी एकूण सात पदके जिंकली तर मिरजच्या खेळाडूंनी तीन पदके मिळवली. यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरीच्या सलोनी शिर्केने कास्यपदक पटकावले. रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत १६ खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत खेळाडूंनी पश्चिमोत्तानासन, मत्स्यासन, सर्वांगासन, कुक्कुटासन, गर्भासन, उत्थित टिटिभासन, उर्ध्व कुक्कुटासन, भूमासन, पूर्णशलभासन, पूर्णचक्रासन, पूर्ण मत्स्येंद्रासन, उत्तानपादासन इत्यादी विविध आसने सादर केली. त्यानुसार खेळाडूंना गुण देण्यात आले.
--------------------