रत्नागिरी ः शासकीय कार्यालयातील गळती होणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः शासकीय कार्यालयातील गळती होणार बंद
रत्नागिरी ः शासकीय कार्यालयातील गळती होणार बंद

रत्नागिरी ः शासकीय कार्यालयातील गळती होणार बंद

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१३p२७.jpg-KOP२३L८८७९३ रत्नागिरी ः दक्षिण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या छताची दुरुस्ती करण्यात आली असून कौले काढून आता पत्रा टाकण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयातील गळती होणार बंद
पावणेदोन कोटींचा निधी; जिल्हा नियोजनेमधून पालकमंत्री सामंतानी दिली मंजुरी
रत्नागिरी, ता. १३ ः शासकीय इमारतींच्या गळतीचा प्रश्न यंदाच्या पावसाळ्यात सुटणार आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्यातील अनेक शासकीय इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात छतावर प्लास्टिक कागद घालून गळती थांबवावी लागते; मात्र यावर्षी शासकीय इमारतींच्या छतांच्या दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटीचा निधी प्राप्त झाला असून त्यातून दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीला तत्काळ मंजुरी दिली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर तालुक्यांमधील काही शासकीय इमारीतींची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या इमारत छपराची आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या दुरुस्तीच्या कामाचा यामध्ये समावेश आहे. पावसाळ्यात या इमारतींना गळतीचा त्रास होता. त्यामुळे दरवर्षी कौलारू छपरांवर प्लास्टिक कापड विभागाकडे वर्गही केला आहे. टाकून कार्यालयातील कागदपत्र आणि इतर साहित्य सांभाळत राहावे लागत होते. धान्य गोदाम आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयालाही पावसाचा तडाखा बसत होता. पालकमंत्री उदय सामंत हे नियोजन समितीचे अध्यक्ष असून त्यांनी शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ८४ लाख १६ निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकामकडे काम वर्गही केली आहेत.
यामध्ये देवरूखमधील धान्य गोदामाच्या समावेश असून त्याला वेदरशेड करण्याचे काम अंतर्भूत आहे. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या राजापूर तहसील इमारतीच्या छपराची महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन मंजुरी दिली. त्याचबरोबर या दुरुस्ती कामासाठी १ कोटी २७ लाख ५७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, रत्नागिरीतील विशेष कारागृह आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाची नवीन चिऱ्यांची संरक्षक भिंतही उभारली जात आहे. हे कामसुद्धा अंतिम टप्प्यात आहे.