
गाळ निर्मुलनासाठी 5 हजारांची मदत
rat१३३९.txt
फोटो ओळी
-rat१३p३२.jpg ः
L८८८४१
राजापूर ः पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्याकडे गाळ निर्मुलन अभियानासाठी मदत सुपूर्द करताना ज्ञानेश्वर दुधवडकर, सुनील जाधव, शंकर पाटील, बाळू पेडणेकर आदी.
--
कोंढेतड मित्रमंडळाने गाळ उपशासाठी दिली मदत
राजापूर, ता. १३ ः नाम फाउंडेशन, इमेन्स फाउंडेशन याच्या जोडीला महसूल विभाग व राजापूर नगर पालिकेने लोकसहभागातून आखलेल्या राजापूर शहर गाळ निर्मुलन अभियानाला कोंढेतड भंडारवाडी येथील मित्रमंडळाने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी ही रोख मदत स्वीकारली.
राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवली व अर्जुना या दोन नद्यांमध्ये प्रचंड गाळ साचल्याने राजापूर शहरवासीयांनी पुढाकार घेत सध्या गाळ निर्मुलन अभियान राबवले आहे. मुळ राजापूरकर मंडळी अधिक संख्येने यात गर्क आहेत. त्यातूनच विविध वाड्यांमधून या गाळ निर्मुलनासाठी डिझेल खर्चापोटी निधीची मदत केली जात आहे. राजापूर शहरात नोकरी-धंद्यामुळे स्थिरावलेल्या काही मोजक्या मंडळींचीदेखील या अभियानाला मदत होत आहे. दरम्यान, कोंढेतड भंडारवाडी येथील मित्रमंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधवडकर, सुनील जाधव, शंकर पाटील, बाळू पेडणेकर, संजय कुवेसकर, तुषार चाळके, मिलिंद धुळप, आनंद दुधवडकर, प्रकाश पाटील, विनायक साबळे, मारूती चव्हाण आदींनी ही मदत एकत्रित करून नगर पालिकेच्या जितेंद्र जाधव यांच्याकडे सुपूर्द केली.