
रत्नागिरी-पाटपन्हाळे येथे आज रोजगार मेळावा
पाटपन्हाळेत आज रोजगार मेळावा
रत्नागिरी, ता. १३ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व पाटपन्हाळे ग्रामपंचायत सहकार्याने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत रोजगार मेळावा पाटपन्हाळे येथील ग्रामपंचायत सभागृहात मंगळवारी (ता.१४) सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे. मेळाव्याला जिल्हा उदयोग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, पंतप्रधान निर्मिती योजना, बीज भांडवल, क्लस्टर, योजना व जिल्हा उद्योग केंद्राच्या इतर योजना बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
योजना राबवताना लाभार्थी व बँकांना येणाऱ्या समस्यांबाबत बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नंदकिशोर पाटील मार्गदर्शन करणार आहेत. रोजगार, स्वयंम रोजगार करू इच्छिणार्या इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच कर्ज योजनेतील प्रलंबित अर्जदारांनीही कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.