ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती
ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती

ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती

sakal_logo
By

rat१४२०.txt

बातमी क्र. २० (टूडे पान २ साठी)

फोटो
- rat१४p२२.jpg -
८८९३३
राजापूर ः ताम्हाणे येथील ट्रान्सफॉर्मर बदलताना महावितरणचे कर्मचारी.

ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती

ताम्हाणे शेडेवाडी ः नीलेश राणे यांच्या स्वीय सहाय्यकांकडून पाठपुरावा

राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील ताम्हाणे शेडेवाडी येथील विद्युतवाहिनीचे ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने गेले ३ महिने परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा सुरू होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणकडून कोणतीच दखल घेतली जात नव्हती. अखेर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे जागे झालेल्या महावितरण विभागाने ट्रान्सफॉर्मर बसवला असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
ताम्हाणे शेडेवाडी येथील विद्युतवाहिनीचे ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने गेले तीन महिने या विद्युतवाहिनीवरून कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. परिणामी, या सर्व लाईन टू पेज झाल्याने अनेक शेतीपंप, इंधन विहीरपंप व ट्यूबलाइट्स, फ्रिज बंद अवस्थेत होते. त्यामुळे ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत सौंदळ येथील उपविभाग कार्यालयाला अनेकवेळा ग्रामस्थांनी भेट देऊन समस्या सांगितली तरी ट्रान्सफॉर्मरचे काम होत नव्हते. अखेर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ताम्हाणे येथील भारतीय जनता बूथ अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अरविंद लांजेकर यांच्याशी संपर्क केला. लांजेकर यांनी नीलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश मगदूम यांच्याशी संपर्क करून ग्रामस्थांची व्यथा सांगितली. योगेश मगदूम यांनी अधिकारी सकपाळ व डोंगरे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्या वेळी चार दिवसात ट्रान्सफॉर्मर बसवून देतो असे सांगितले. त्यानुसार ट्रान्सफॉर्मर बसवून काम पूर्ण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.