
पर्यटकांनी गजबजणारे दापोलीतील किनारे सुनेसुने
rat१४२६.txt
- rat१४p३२.jpg-
८८९८५
हर्णै ः किनाऱ्यावर पर्यटकांची प्रतिक्षा करणारे होडीवाले.
- rat१४p३३.jpg ः
८८९६४
पर्यटकांअभावी मुरूड बीचवर सन्नाटा.
- rat१४p३४.jpg ः
८८९६५
घोडे सवारीवालेही किनाऱ्यावर थांबून.
पर्यटकांनी गजबजणारे दापोलीतील किनारे सुनेसुने
परीक्षांमुळे पर्यटन थंडावले ः फेरीवाल्यांना प्रतिक्षा
हर्णै, ता. १४ ः दहावी, बारावीच्या परीक्षांमुळे नेहमी पर्यटकांनी गजबजणारे दापोली तालुक्यातील मुरूड बीचवर सन्नाटा पसरला आहे. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा हे किनारे फुल्ल होतील असे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
दापोली तालुक्यात मुरूड, पाळंदे, कर्दे, आंजर्ले, लाडघर, हर्णै, कोळथरे येथील संपूर्ण किनारपट्टी स्वच्छ आणि सुंदर असल्याने हे समुद्रकिनारे पर्यटकांच्या नेहमीच गर्दीने फुल्ल असतात. सुट्टी पडली की, पर्यटक या बीचवर गर्दी करायला सुरवात करतात. सकाळीच समुद्रामध्ये आंघोळ करणे, वाळूत फिरणे, बीचवर असणाऱ्या वॉटरस्पोर्टचा आनंद लुटणे यामध्ये पर्यटक मग्न होऊन जातात. डॉल्फिन सफर, बलूनमधून आकाशाची सैर, पॅरासेलिंग, स्लीपर आदी खेळांचा आनंद पर्यटक लुटतात. विशेषकरून मुरूड, पाळंदे, हर्णै समुद्रकिनारी डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात. या डॉल्फिन सफरसाठी या परिसरातील हर्णै, मुरूड, पाळंदे या ठिकाणी खास फायबरच्या फेरीबोटी तयारच असतात. या परिसरात आलेला प्रत्येक पर्यटक डॉल्फिन बघितल्याशिवाय जातच नाही, अशी खासियत आहे. हा मासा समुद्रात उंच उडी घेऊन पुन्हा पाण्यात जातो. हे दृश्य पाहताना पर्यटकांना वेगळाच आनंद मिळतो असतो तसेच आजकाल शॉर्ट विकेंड ट्रीपसाठी अनेक पर्यटक कोकणची निवड करतात. लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणातल्या या किनाऱ्यांवर दाखल होतात.
-
उलाढाल ठप्प
सध्या ३१ डिसेंबरच्या हंगामानंतर जानेवारी महिन्यात शनिवार-रविवार विकेंडला पर्यटक येत होते; परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा सुरू झाल्यापासून पर्यटकांनी समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर असणारे खाऊचे स्टॉल, वॉटरस्पोर्ट्स गेम्स, इतर उद्योग बंद आहेत. किमान विकेंडला होणारी हजारो रुपयांची उलाढाल अजूनही थांबली आहे. स्थानिकांनी पर्यटकांच्या सेवेसाठी जय्यत तयारी केली आहे. पर्यटक हंगाम कधी चालू होणार याची स्थानिक वाट बघत आहेत. परीक्षा संपल्याशिवाय पर्यटन हंगाम सुरू होऊ शकत नाही, असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.