26 निक्षय मित्रांनी घेतले 27 क्षय रूग्णांना दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

26 निक्षय मित्रांनी घेतले 27 क्षय रूग्णांना दत्तक
26 निक्षय मित्रांनी घेतले 27 क्षय रूग्णांना दत्तक

26 निक्षय मित्रांनी घेतले 27 क्षय रूग्णांना दत्तक

sakal_logo
By

rat१४३.txt


काही सुखद-------लोगो

२६ निक्षय मित्रांनी घेतले २७ क्षयरुग्णांना दत्तक

राजापूर तालुका ः पोषण आहारासाठी शासनाची मदत अपुरी

राजापूर, ता. १४ ः क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार मिळावा यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाकडून जिल्ह्यात क्षयरोग मुक्त भारत अभियान राबवण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत राजापूर तालुक्यातील २६ निक्षय मित्रांनी आतापर्यंत २७ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. हे निक्षयमित्र त्यांना दर महिन्याला आर्थिक मदत करतात.
क्षयरोग मुक्त भारत अभियनांतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये पोषण आहारासाठी शासनामार्फत त्यांचे बँकखात्यावर जमा केले जातात; परंतु सदरची मदत ही अत्यंत अल्प असल्यामुळे आरोग्य विभागाने समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था यांना औषधोपचार चालू असणाऱ्या रुग्णांना पौष्टिक आहार व इतर मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींना व सामाजिक, औद्योगिक संस्थांना राष्ट्रीय क्षयरोग दुरिकर कार्यक्रमाअंतर्गत निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांच्या सहकार्यासाठी आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने आपल्या राजापूर तालुक्यातील आनंद सदाशिव सावंत, अमित साळवी, रामदास पवार, आनंद धावडे, प्रकाश देवस्थळी, दीपक नागले, शीतल बावकर, डॉ. रोहित झेंडे, अरुण तांबे, तन्मय महाजन, श्रुतिका खरात, डॉ. उमेश चव्हाण, ऋषिकेश पाटील, डॉ. आदित्य शिंदे, विनायक निखारगे, पकाराम राईका आणि आरोग्य विभाग राजापूर येथील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी असे निक्षय मित्र झाले. एकूण २६ निक्षय मित्रांनी आतापर्यंत २७ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. या रुग्णांना औषधोपचार चालू असेपर्यंत निक्षय मित्रांकडून रुग्णांना पोषण आहार पुरवला जाणार आहे. राजापूर तालुक्यातून जास्तीत जास्त निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.