चिपळुणात मचूळ पाणीप्रश्नाने पुन्हा डोकं वर काढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात मचूळ पाणीप्रश्नाने पुन्हा डोकं वर काढले
चिपळुणात मचूळ पाणीप्रश्नाने पुन्हा डोकं वर काढले

चिपळुणात मचूळ पाणीप्रश्नाने पुन्हा डोकं वर काढले

sakal_logo
By

rat१४३७.txt

- rat१४p४७.jpg ः
८९०३९
चिपळूण ः चिपळूण शहरातील गोवळकोट येथील जॅकवेलच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

चिपळुणात मचूळ पाणीप्रश्न

गोवळकोटच्या जॅकवेलमधून पुरवठा, जलशुद्धीकरण प्रक्रियाच होत नसल्याची शंका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः दाभोळ खाडीतील खारट व मचूळ चवीचे पाणी नगर पालिकेच्या गोवळकोट येथील जॅकवेलमधून शहरात पुरवले जात आहे. या पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काहींना जुलाब व अन्य त्रास होऊ लागल्याने पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामकाजाबाबतीत शंका उपस्थित केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची चव खारट व मचूळ होती. गोवळकोट येथील पालिकेच्या जॅकवेलमधून पुरवले जाणारे हे पाणी पिण्यायोग्य नाही. या पाण्यामुळे अर्ध्या शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. मोठ्या उधाणावेळी खाडीतील खारट पाणी वाशिष्ठी नदीपात्रात शिरते आणि नगर पालिकेच्या जॅकवेलद्वारे तेच पाणी उचलून शहरात पुरवले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया अपेक्षित असताना तसे न करता थेट पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी पिऊन पोटदुखी, जुलाब, उलटीसारखे आजार सुरू होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. होळी पौर्णिमेच्या आधीपासूनच अशाच पद्धतीचे पाणीपुरवठा केला जात आहे. त्या विषयी गोवळकोट, पेठमाप, मुरदपूर, शंकरवाडी, उक्ताड व बाजारपेठ परिसरातील काही भागात हेच पाणी पुरवले जात असल्याने त्याची ओरड केली जात आहे. या विषयी काहींनी मुख्याधिकारी व पालिका पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे; परंतु प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे भागातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
-
जॅकवेल गाळात रूतलेली

नगरपालिकेच्या गोवळकोट येथील जॅकवेल परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने ओहोटीच्यावेळी पाणी उचलणे अशक्य होते. बऱ्याचदा पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या भागातील गाळ उपसा करण्याची वेळोवेळी मागणी केली जात आहे; परंतु याबाबतही योग्य ती दखल घेतली जात नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

कोट
ऐन शिमगोत्सवात शहरातील नागरिकांना मचूळ व खारट चवीचे पाणी प्यावे लागत आहे. या विषयी प्रशासन उपाययोजना का करत नाही. सहा दिवस झाले तरी शहरात एकदाही स्वच्छ पाणी टँकरने पुरवठा केला नाही. नाइलाजाने लहान व वयोवृद्ध लोकांना हेच दूषित पाणी प्यावे लागत आहे.
- वसंत हरवडे, गोवळकोट, चिपळूण.