
वेंगुर्लेतील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू
वेंगुर्लेतील वृद्धेचा
आकस्मिक मृत्यू
सावंतवाडी, ता. १४ ः मुंबई येथे जाण्यासाठी येथील रेल्वे स्थानकात आलेल्या वेंगुर्ले-मोचेमाड येथील वृद्धेचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. इंदुमती मधुसूदन गावडे (वय ७५, रा. तरवाडी), असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. मळगाव रेल्वेस्थानकात अचानक अत्यवस्थ पडल्याने गावडे यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबतची खबर रुपेश रमेश खोत यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक माहिती अशी की, मयत गावडे या मुलगा श्यामसुंदर गावडे व त्यांचा मित्र रुपेश खोत यांच्यासोबत मुंबई येथे जात होत्या. त्यासाठी आज सकाळी येथील रेल्वेस्थानकात आल्या. यादरम्यान त्यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.