पर्यायी स्वच्छतागृहाची उभारणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यायी स्वच्छतागृहाची उभारणी करा
पर्यायी स्वच्छतागृहाची उभारणी करा

पर्यायी स्वच्छतागृहाची उभारणी करा

sakal_logo
By

89255
कणकवली : शहरातील भाजी मार्केटमधील स्वच्छतागृहाबाबत विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली.


पर्यायी स्वच्छतागृहाची उभारणी करा

सुशांत नाईक; कणकवली भाजी मार्केटमधील गैरसोयीवर बोट

कणकवली, ता.१५ : शहरातील पटवर्धन चौक येथील भाजी मार्केटमध्ये असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह नगरपंचायतीने तोडले. या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह बांधले जाणार आहे. मात्र नवीन स्वच्छतागृह होईपर्यंत येथील कर्मचारी, नागरिकांसाठी तात्‍पुरत्या स्वरूपातील पर्यायी स्वच्छतागृहाची उभारणी करा अशी मागणी नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांनी केली आहे.
भाजी मार्केट परिसरातील स्वच्छतागृह तोडल्‍यानंतर नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनाही तेथे बोलावून भाजी मार्केट परिसरातील गाळेधारक, त्‍यामधील कर्मचारी तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची होणारी गैरसोय याबाबतची माहिती दिली. यावेळी भाजी मार्केटमधील कर्मचारी, ग्राहक यांनी अापल्‍या समस्या मुख्याधिकारी श्री.तावडे यांच्यापुढे मांडल्‍या.
भाजी मार्केट येथे नवीन स्वच्छतागृह उभारणीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत कणकवलीतील व्यापारी आणि नागरिक यांना बसस्थानकातील स्वच्छतागृह येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्‍यामुळे याठिकाणी तात्‍पुरत्‍या स्वच्छतागृहाची उभारणी करा आणि नवीन स्वच्छतागृह तातडीने उभारणी करा अशी मागणी येथील कर्मचारी, ग्राहकांसह विरोधी पक्ष नगरसेवकांनी केली. तर नवीन स्वच्छतागृह तातडीने उभारणीचे निर्देश संबधितांना दिले जातील अशी ग्‍वाही मुख्याधिकारी श्री.तावडे यांनी दिली.
-------------
चौकट
पर्यायी स्वच्छतागृहाची व्यवस्था
भाजी मार्केट मधील व्यापारी, ग्राहक, कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्‍हणून त्‍यांना भाजी मार्केट लगतच्या सना कॉम्प्लेक्‍समधील स्वच्छतागृह उपलब्‍ध करून दिले आहे. तसेच भाजी मार्केट समोरील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्‍समधील स्वच्छतागृहही लवकरच उपलब्‍ध करून दिले जाणार असल्‍याची माहिती नगरपंचायत आरोग्‍य सभापती ॲड. विराज भोसले आणि बांधकाम सभापती संजय कामतेकर यांनी दिली. येथील व्यापारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाबाबतची समस्या मांडल्‍यानंतर त्‍यांना तातडीने पर्यायी व्यवस्था केल्याचेही श्री.भोसले, श्री.कामतेकर यांनी सांगितले.