अंजनावीडीत सभागृहाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंजनावीडीत सभागृहाचे उद्घाटन
अंजनावीडीत सभागृहाचे उद्घाटन

अंजनावीडीत सभागृहाचे उद्घाटन

sakal_logo
By

rat१४१६.txt

- rat१५p२४.jpg-
८९२६०
गुहागर ः साखरीआगर अंजनवाडीतील सभागृहाचे उद्घाटन करताना नेत्रा ठाकूर.

साखरीआगर अंजनवाडीत सभागृहाचे उद्घाटन

गुहागर ः आमदार भास्कर जाधव यांनी साखरीआगर अंजनवाडीतील सभागृहासाठी दिलेल्या ५ लाखाच्या निधीतून वर्षभरात सभागृह बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते झाले. आमदार जाधव यांनी निधी देण्याचे आश्वासन पूर्ण केले. गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेले सभागृह अंजनवाडीत झाले. त्यामुळे अंजनवाडीतील ग्रामस्थ आमदार जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील, असे आश्वासन या सोहळ्यात अंजनवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्रा ठाकूर यांना दिले. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार जाधव यांनी ठाकूर यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने उद्‌घाटन करण्यास सांगितले होते. त्यानुसार झालेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत साखरीआगरच्या सरपंच दुर्वा पाटील, पुनम पाष्टे, सिताराम ठोंबरे, विलास वाघे, जोत्स्ना काताळकर, सरपंच चैतन्य धोपावकर, सरपंच जनार्दन आंबेकर, सरपंच आर्या मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळाचे सचिव राजेंद्र कदम यांनी कार्यकमाचे सुत्रसंचालन केले. सुरेश कदम यांनी आभार मानले.
-

Rat१५p२५.jpg ः
८९२६१
मंडणगड ः निवळी नदीवर वनराई बांधताना नगरपंचायत कर्मचारी.

जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी
निवळी नदीवर वनराई बंधारा

मंडणगड ः मार्च, एप्रिल व मे महिन्यात उद्भव विहिरीत पाणीसाठा कमी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, याकरिता मंडणगड नगरपंचायतीच्यावतीने जानेवारी महिन्यापासून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. उद्भव विहिरीच्या जलस्रोतांचे बळकटीकरण सर्व संभाव्य जलस्रोतांचा वापर करून पाणी कपात करावी लागणार नाही. यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहे. नुकतेच नगरपंचायतीच्यावतीने निवळी नदीवर मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा बांधण्यात आला. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता कमिटी सभापती सुभाष सापटे, प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे, पाणी विभागप्रमुख विकास साळवी, कर्मचारी गणेश सापटे, प्रमोद मर्चंडे, प्रकाश करावडे, मोहन तलार, संतोष शिगवण, रूपेश तांबे, अभिजित साळवी, महेंद्र मर्चंडे, शरद धोत्रे यांनी श्रमदान करून सहकार्य केले. या उपक्रमामुळे उद्भव विहिरीला पुरेसा पाणीसाठा मिळू लागला आहे.

-
- rat१५p२६.jpg-
८९२६२
दापोली ः ''इंदुमती लक्ष्मणराव यादव इमारत’ चे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष संजय जगताप.
--
बेलोसे महाविद्यालयात बीएससीसाठी नवीन इमारत

हर्णै ः वराडकर-बेलोसे महाविद्यालयातील बीएससी (आयटी) साठी नव्याने सज्ज झालेल्या ‘इंदुमती लक्ष्मणराव यादव इमारती’ चे उद्घाटन संस्थेचे नूतन अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. दापोली तालुक्यातील काजू उद्योजक धनंजय यादव यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदुमती लक्ष्मणराव यादव यांच्या नावाने वराडकर-बेलोसे महाविद्यालयास बीएससी आयटी या कोर्सच्या इमारतीच्या बांधकामासाठी १० लाख रु. देणगी दिली होती. या अभ्यासक्रमाची स्वतंत्र इमारत बांधून झाली आहे. या इमारतीचे नामकरण ‘इंदुमती लक्ष्मणराव यादव इमारत’ असे करण्यात आले. इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. मुंबई विद्यापीठाचा बीएससी (आयटी) हा पदवी अभ्यासक्रम येथे होणार आहे. धनंजय यादव हे उद्योजक असून त्यांचा वळणे यथे काजू फॅक्टरी-कोकण फळप्रक्रिया व हॉटेल व्होल्गा तर कुर्ला येथे लक्ष्मणराव यादव यांच्या नावाने भाजीमार्केट आहे. उद्योग-व्यवसायात सुमारे २०० पेक्षा अधिक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या वेळी सभापती शिवाजी शिगवण, उपसभापती प्रियदर्शन बेलोसे, विश्वस्त कासमभाई महालदार, डॉ. दशरथ भोसले, डॉ. भारत कऱ्हाड, अनंतराव सणस, सुनीता बेलोसे, मीना कुमार रेडीज, सुनील चव्हाण, सुरेश पवार आदी उपस्थित होते.
-