काम बंद आंदोलनाला राजापुरात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काम बंद आंदोलनाला राजापुरात प्रतिसाद
काम बंद आंदोलनाला राजापुरात प्रतिसाद

काम बंद आंदोलनाला राजापुरात प्रतिसाद

sakal_logo
By

rat१४५३.txt

- rat१४p५७.jpg ः
८९०८२
राजापूर ः येथील तहसील कार्यालय परिसरात घोषणा देणारे कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात संपाची माहिती देणारा फलक.

काम बंद आंदोलनाला राजापुरात प्रतिसाद

राजापूर, ता. १५ ः जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला राजापूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व कर्मचाऱ्यांनी राजापूर तहसील कार्यालय परिसरात एकत्र येत घोषणा दिल्या.
समन्वय समितीतर्फे सध्याच्या एन. पी. एस. ही पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य प्रलंबित १० मागण्यांसाठी संप पुकारला आहे. तालुक्यातील सर्व विभागातील शासकीय कर्मचारी सुरू झालेल्या बेमुदत संपात उतरले होते. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेली तालुक्यातील शासकीय कार्यालये ओस पडली. पेन्शन आमच्या हक्काची .... नाही कुणाच्या बापाची ...इथपासून नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा कर्मचारी देत होते. कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू झालेल्या बेमुदत संपामुळे सर्व सामान्य नागरिकांची पंचाईत झाली होती. कार्यालये ओस पडल्याने शासकीय कामासाठी आलेल्यांना माघारी परतावे लागले.