
कृषी पदवी घेतलेल्यांनी आव्हानांना सामोरे जा
rat15p29 .jpg ः
89289
दापोली ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार.
कृषी पदवी घेतलेल्यांनी आव्हानांना सामोरे जा
डॉ. एस. अय्यपनः कृषी प्रदर्शनाच्या सुयोग्य व आकर्षक मांडणी
दाभोळ, ता. १५ः कृषी क्षेत्राशी संबंधित पदवी घेऊन बाहेर पडलेल्यांनी कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे माजी महासंचालक डॉ. एस. अय्यपन यांनी दापोली येथे केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती हा व्यवसाय समजून उद्योजक होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. खऱ्या अर्थाने शेतीचे संवर्धन, संरक्षण आणि संस्करण ही जबाबदारी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची आहे. जागतिकस्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आगामी काळात कृषी विद्यापीठांमधील सर्व सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यपालांनी आपल्या विधिमंडळाच्या अभिभाषणात सांगितले होते. त्याची पूर्तता कृषी विभाग करेल आणि कृषी विभागांतर्गत सर्व पदे भरली जातील याची काळजी शासन घेत असल्याचे सांगितले. कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचा आणि या पदवीदान समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या सुयोग्य व आकर्षक मांडणीचे कृषिमंत्री यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून शिक्षण घेऊन घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या गावाचा, शेतीचा आणि समाजाचा विकास करावा, असे आवाहन केले.