''लावण्यसिंधू''तर्फे कणकवलीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव

''लावण्यसिंधू''तर्फे कणकवलीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव

swt1616.jpg
89442
कणकवलीः लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

‘लावण्यसिंधू’तर्फे कणकवलीत
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ः जागतिक दिनानिमित्त कणकवली येथील लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्यावतीने भवानी हॉल येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वावलंबी बनलेल्या महिलांचा विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या सखी वन्स सेंटरच्या संचालिका ॲड. सुवर्णा हरमलकर, लावण्यसिंधू चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सचिव नितीन तळेकर, संचालिका प्रांजल पराडकर, सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा व लावण्यसिंधूच्या संचालिका अक्षता कांबळी, मिळून साऱ्याजणी मंचच्या अध्यक्षा नीलम सावंत-पालव, जनजागृती सेवा समिती महाराष्ट्रचे गुरुनाथ तिरपणकर आदी उपस्थित होते. महिला बचतगटाच्या वस्ती स्तर संघ अध्यक्षा दिव्या साळगावकर यांच्या पथकाने दीपनृत्याने समारंभाचा प्रारंभ केला. प्रास्ताविक लावण्यसिंधूचे अध्यक्ष उपरकर यांनी केले. त्यांनी संघटित महिला शक्तीचे लाभ कशाप्रकारे मिळू शकतात, याबाबत मार्गदर्शन केले. सखी वन्स स्टॉप सेंटरच्या संचालिका हरमलकर यांनी उपस्थित महिलांना कौटुंबिक, सार्वजनिक व इतर प्रकारे विना मोबदला सहाय्य करणाऱ्या केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून स्वावलंबी झालेल्या शीतल मेस्त्री, लक्ष्मी गवस, साक्षी आमडोस्कर, स्वप्नाली तांबे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रांजल पराडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com