-कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन 50 दिवसांनी स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन 50 दिवसांनी स्थगित
-कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन 50 दिवसांनी स्थगित

-कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन 50 दिवसांनी स्थगित

sakal_logo
By

rat१६१६.txt


फोटो ओळी
-rat१६p१२.jpg ः
८९३९७
मुंबई ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना कृषी अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी.
-
कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

दाभोळ, ता. १६ ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी ५० दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
कृषी अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी (ता. १४) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कृषी अभियंत्यांनी त्यांना आपल्या सर्व मागण्यांची माहिती दिली. त्या सर्व मागण्या समजून घेत उपमुख्यमंत्री यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर उच्चस्तरीय समिती गठित करून कृषी अभियंत्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन देत आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटना कृषी अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सुरवातीपासूनच कृषी अभियंत्यांच्या सर्व मागण्या समजून घेऊन भविष्यात कृषी अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. या आंदोलनादरम्यान ज्यांनी सहकार्य केले त्यांचेही कृषी अभियंत्याकडून आभार व्यक्त केले गेले आहेत.