चिंदरमधील व्यापाऱ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंदरमधील व्यापाऱ्याचा
रेल्वेतून पडून मृत्यू
चिंदरमधील व्यापाऱ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

चिंदरमधील व्यापाऱ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू

sakal_logo
By

मुख्य अंकात घेणे

टीपः swt१६.jpg मध्ये फोटो आहे.

संदीप पारकर


चिंदरमधील व्यापाऱ्याचा
रेल्वेतून पडून मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १६ : चिंदर येथील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि वैभवशाली पतसंस्थेचे संचालक संदीप हरी पारकर (वय ५८, रा. चिंदर भटवाडी) यांचा आज सकाळी रेल्वेतून पडून मृत्यू झाला.
पारकर हे चिंदरमधील भगवती मंगल कार्यालय आणि पारकर टी हाऊसचे मालक होते. गावातील प्रत्येक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. ते भगवती उत्साही मंडळाचे खजिनदार आणि आधारस्तंभ होते. चिंदर येथील रामेश्वर देवस्थान समितीचे ते सचिव, तर आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे संचालक होते. रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता. मनमिळाऊ आणि शांत स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. कोणत्याही प्रसंगी मदतीसाठी ते सदैव तत्पर असायचे. त्यांच्या निधनाने चिंदर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.