
कृषि प्रदर्शन उद्घाटन
rat१६२९.txt
बातमी क्र. २९ (पान २ साठी, संक्षिप्त)
फोटो ओळी
-rat१६p११ .jpg ः
८९३९६
दापोली ः कृषी प्रदर्शनात माहिती घेताना राज्यपाल रमेश बैस.
-
राजपालांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
दाभोळ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या ४१व्या पदवीदान समारंभासाठी आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. बैस यांनी प्रदर्शनातील प्रत्येक दालनास भेट देऊन विविध संशोधनांची माहिती जाणून घेतली. विद्यापीठ परिसरातील हेलिपॅडवर राज्यपाल बैस यांचे आगमन झाल्यावर विद्यापिठाच्यावतीने कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी तर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी राज्यपालांचे स्वागत केले. या वेळी विद्यापीठाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील महत्वाचे अधिकारी राज्यपाल यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
-
मुलगी समजावून घेतानावर चर्चासत्र
सावर्डे ः सामाजिक कामकाजासाठी राजकारणाचा उपयोग होतो यासाठी आधी माणसे ओळखता आली पाहिजेत आणि वेळ देता आला पाहिजे तो वेळ मी नेहमीच दिला आहे. त्यामुळेच मी सामाजिक काम करू शकले. तरुणींनीसुद्धा अशा प्रकारच्या सामाजिक कामामध्ये आधी भाग घेऊन नंतर राजकारणामध्ये सक्रिय व्हावे, असे आवाहन माजी सभापती पूजा निकम यांनी केले. सावर्डेतील महाविद्यालयात
महिला विकास कक्षच्या माध्यमातून मुलगी समजावून घेताना हे एक दिवसाच्या चर्चासत्रानिमित्त त्या बोलत होत्या. शिक्षण, रोजगार, आरोग्य, सोशलमीडिया व कौटुंबिक हिंसाचार, राजकारणात स्त्रियांचा सहभाग व विपश्यनाविषयी या चर्चासत्रात करण्यात आली. या वेळी युगंधरा राजेशिर्के, पोलिस धनश्री करंजकर, प्राध्यापक दीप्ती शेंबेकर, मेधा सावर्डेकर माधवी जाधव आदी उपस्थित होत्या.
सावर्डे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक धनश्री करंजकर यांनी युट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्त्रियांची, मुलींची फसवणूक होत असून त्याबद्दल सजग राहावे. कुणाला ओटीपी व फोटो शेअर करू नये. तसेच मैत्री करत असताना त्याची पूर्ण खात्री करून मैत्री करणे अशा प्रकारचा महत्वपूर्ण सल्ला मुलींना दिला. स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.
-
रविवारी वधू-वर परिचय मेळावा
लांजा ः समाजातील उपवर मुला-मुलींच्या लग्नाचे प्रश्न जटिल होत असल्याने लांजा तालुका बौद्धजन संघ यांच्यावतीने रविवारी (ता.१९) सकाळी ११ ते ३ वा. कुलकर्णी-काळे छात्रालय येथे पाचवा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लांजा तालुका बौद्धजन संघ यांच्यावतीने नियमित सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जातात. समाजातील उपवर मुलामुलींच्या लग्नांचा प्रश्न जटिल होत आहे तसेच लग्न जुळवून आण्यासाठी वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याची बाब लक्षात घेऊन संघाने गेली चार वर्षे वधू-वर परिचय मेळावे घेऊन हा प्रश्न सोडवण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या महामारीत परिचय मेळावा घेण्यात आला नव्हता. यावर्षी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संघाच्यावतीने घेण्यात आला आहे. तरी या मेळाव्याला समाजातील जास्तीत जास्त उपवर मुलामुलींनीसहभाग घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष संतोष पडवणकर, अशोक कदम, सुनील कांबळे, विश्वास कांबळे, सुधाकर कांबळे, आनंद कांबळे, संजय कांबळे आदींनी केले आहे .
--