कल्याणकारी योजना गावोगावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणकारी योजना गावोगावी
कल्याणकारी योजना गावोगावी

कल्याणकारी योजना गावोगावी

sakal_logo
By

rat१६२७.txt

कल्याणकारी योजना लोककलेतून गावोगावी

लांजा ः जिल्हा माहिती कार्यालय आणि भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था (भाकर) यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा व राजापूर तालुक्यांमध्ये शासनाच्या जनकल्याणकारी योजनाचा लोककलांच्या माध्यमातून जागर सुरू आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनच्या महिला व बालविकास विभागांच्या योजना, जननीसुरक्षा योजना, समुपदेशन केंद्र, महिला व मुलांकरिता विशेष साहाय्य कक्ष, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषदची जलजीवन मिशन योजना, मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, एसटी महामंडळाची नवीन योजना, कृषी विभागाच्या योजना तसेच कलाकार मानधन योजना, भाकर सेवा संस्था पथनाट्यातून व नाटिकेच्या स्वरूपात लोकांना सोप्या व मजेशीररित्या समजतील अशा सादर करत आहे. शासनाच्या योजनांवर गीतदेखील गायन करून जनजागृती करत आहे.
-
फोटो ओळी
- rat१६p१०.jpg ः
८९३९५
देवरूख संपकर्त्यांशी प्रमोद जठार यांनी साधला संवाद.

माजी आमदार प्रमोद जठारांनी घेतली संपकर्त्यांची भेट

साडवली ः जुनी पेन्शनसाठी राज्यात सर्वत्र शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. त्याच आंदोलनाचे पडसाद संगमेश्वर तालुक्यात उमटले. संपाच्या दुसऱ्‍या दिवशी भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांचा संगमेश्वर तालुक्याचा दौरा होता. या दौऱ्यावेळी जठार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या दरम्यान आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आपल्या मागण्यांसंदर्भात समिती नियुक्त आहे तरीही नक्कीच राज्य सरकार आपल्याला योग्य न्याय देईल हा विश्वास आहे, असे मत मांडले. राज्य सरकार आपल्या भावनांचा विचार करत असून लवकरच योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील, असे आश्वासन दिले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष लांडे यांनी जठार यांचे आभार मानले. या वेळी संगमेश्वर तालुका भाजपा पदाधिकारी सोबत होते.