लांजा-32 शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-32 शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गौरव
लांजा-32 शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गौरव

लांजा-32 शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गौरव

sakal_logo
By

८९६४४

सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी संघटना ; कृतज्ञता सोहळ्याचे कौतुक

लांजा, ता. १८ ः कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक भान ठेवत क्रियाशील असलेल्या माजी विद्यार्थी असोसिएशनचे काम कौतुकास्पद आहे. लांजाच्या माजी विद्यार्थी असोसिएशनने सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कृतज्ञता सोहळा हा कृतार्थतेचा सोहळा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रमोद कदम यांनी केले.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजाचा स्थापना दिवस व संस्थेचे सीईओ भाऊसाहेब वंजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी विद्यार्थी असोसिएशनने संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व वरिष्ठ महाविद्यालय या दोन्ही शैक्षणिक संकुलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या गत ७५ वर्षातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. माजी विद्यार्थी असोसिएशनने इथून शिक्षण घेतलेली तरुणाई महानगराकडे स्थलांतर करत असल्यामुळे कोकणातील गावे वृद्ध बनत चालली आहेत, या प्रश्नावर प्रामुख्याने काम करावे अशी सूचनाही त्यांनी केली. या वेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे, उपाध्यक्ष सुनील कुरूप, सचिव विजय खवळे, संचालक महंमद रखांगी, पुरुषोत्तम साळवी, प्रसन्ना शेट्ये, प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, मुख्याध्यापिका विद्या आठवले आदी उपस्थित होते.
३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कृतज्ञता सन्मानाने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षक-पालक संघाने हायस्कूलमध्ये मुलींच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहासाठी माजी विद्यार्थी असोसिएशन निधी देऊन सहकार्य करावे. कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक महंमद रखांगी यांनी माजी विद्यार्थी असोसिएशनच्या दमदार वाटचालीचे कौतुक केले.
-
माजी विद्यार्थ्यांनी दिली चार लाखाची मदत

माजी विद्यार्थी असोसिएशनने यशस्वी केलेल्या सेलिब्रिटी नाईट कार्यक्रमातून जमा केलेल्या शैक्षणिक निधीतून ४ लाख रुपयाचा धनादेश न्यु एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द केला. शिक्षक-पालक संघाने ३ लाखाचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. या वेळी मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुलींचे आधुनिक प्रसाधनगृह उभारण्यात येईल, याची ग्वाही संस्थेने दिली.
-