टुडे पान एक-नोटिसा बजावल्या तरी माघार नाही
टुडे पान एक
८९६८२
नोटिसा बजावल्या तरी माघार नाही
संपकऱ्यांचा इशारा ः आता ''आरपार''ची लढाई
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः संपातील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावा अगर कितीही कठोर कारवाई करा, आता संपातून माघार नाही. आता ''आर या पार''ची लढाई हाच एकमेव मार्ग उरला आहे, अशी परखड भूमिका समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी आज आंदोलनादरम्यान घेतली.
जुन्या पेन्शनसाठी १४ मार्चपासून सुरू असलेल्या संपातील काही संपकऱ्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. शासन संपकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहे; परंतु अशा कितीही नोटिसा बजावल्या अगर कितीही मोठी कठोर कारवाई केली तरी आमचे कर्मचारी या कारवाईला भीक घालणार नाहीत, तर आणखी जोमाने संपात सहभागी होतील. संप कमालीचा यशस्वी होत असल्याने शासन बिथरले असून येनकेन प्रकारे संप मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. आमचे कर्मचारी जुनी पेन्शन मिळविण्याच्या मागणीवर ठाम असून कितीही कारवाईचे बडगे उगारलात तरी आता संपातून कोणीही कर्मचारी माघार घेणार नाही, कोणीही बिथरणार नाही. आता ''आर या पार''ची लढाई करू, असा इशारा राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष कोरगावकर यांनी दिला.
आज संपाच्या चौथ्या दिवशी मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवले. यामध्ये दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. शासनाने कितीही दबाव निर्माण केला तरी कर्मचाऱ्यांची एकजूट हा दबाव हाणून पाडेल, असा इशारा या वेळी आंदोलनात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाला दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.