दुचाकीच्या बीबी सिरीजच्या आकर्षक नंबरसाठी मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीच्या बीबी सिरीजच्या आकर्षक नंबरसाठी मुदत
दुचाकीच्या बीबी सिरीजच्या आकर्षक नंबरसाठी मुदत

दुचाकीच्या बीबी सिरीजच्या आकर्षक नंबरसाठी मुदत

sakal_logo
By

दुचाकीच्या बीबी सिरीज सोमवारपासून

रत्नागिरी, ता. १७ ः येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची दुचाकी वाहनांसाठी एमएच-०८-बीबी ही नवीन सीरिज (मालिका) २० मार्चपासून सुरू होणार आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे त्यांनी त्या क्रमांकासाठी असलेल्या विहित शुल्काच्या रकमेचा धनाकर्ष २० मार्चला सकाळी ८.४५ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयात खिडकी क्र. १ (खासगी वाहन विभाग) यांच्याकडे सादर करावा. धनादेश विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. धनाकर्ष “DY RTO RATNAGIRI” यांच्या नावाचा असावा. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांची यादी त्याच दिवशी दुपारी २ वा. कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकासाठी जादा शुल्काचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात २१ मार्च २०२३ला खिडकी क्र. १ (खासगी वाहनविभाग) यांच्याकडे दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करावा. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकाचा लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या दालनात २१ मार्च २०२३ दुपारी २ वा. होईल याची नोंद घ्यावी, असे परिवहन विभागामार्फत कळवण्यात आले आहे.