
पोदार स्कूलमध्ये आरोग्य तपासणी
89758
पोदार स्कूलमध्ये आरोग्य तपासणी
रत्नागिरीः विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याची दक्षता लक्षात घेऊन जागृत पालक सुदृढ बालक मोहिमेअंतर्गत पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्या चतुरस्त्र नैपुण्यात वाढ या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यात आली. यामध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना पौष्टिक व नियमित आहार, वैयक्तिक स्वच्छता इत्यादीविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींना किशोरवयात येताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. शालेय आरोग्य तपासणीसाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र चांदेराई येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी आणि डॉ. शैलेश पाटील (आरबीएसके) जिल्हा शासकीय रुग्णालय आणि त्यांचे वैद्यकीय पथक उपस्थित होते. मुख्याध्यापक राकेश चव्हाण यांनी तपासणीसाठी उपस्थित डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.