रत्नागिरी- आविष्कारचे आज स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- आविष्कारचे आज स्नेहसंमेलन
रत्नागिरी- आविष्कारचे आज स्नेहसंमेलन

रत्नागिरी- आविष्कारचे आज स्नेहसंमेलन

sakal_logo
By

आविष्कारचे
आज स्नेहसंमेलन
रत्नागिरी : मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर व शामराव भिडे कार्यशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (ता. १८) रंगणार आहे. सायंकाळी ४ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात संमेलनाला सुरवात होईल. यामध्ये विद्यार्थी विविध कलाविष्कार सादर करणार आहेत. जि. प. चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्योजक राजन मलुष्टे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बिपीन शहा, सचिव सौ. संपदा जोशी, व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर व मुख्याध्यापिका सौ. वैशाली जोशी यांनी केले आहे.