अवकाळीसह महाडमध्ये गारपीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळीसह महाडमध्ये गारपीट
अवकाळीसह महाडमध्ये गारपीट

अवकाळीसह महाडमध्ये गारपीट

sakal_logo
By

अवकाळीसह महाडमध्ये गारपीट
महाड, ता. १७ : शहरात गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास गारांचा पाऊस कोसळला. या गारपिटीने तालुक्यातील कडधान्य आणि आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारपर्यंत महाडमध्ये उन्हाचे चटके जाणवत असताना सायंकाळी अचानक वातावरण बदलले. तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळीमुळे आंबा व्यावसायिक तसेच वीटभट्टी मालक संकटात सापडले असून मोठ्या नुकसानीची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.