गणित प्राविण्य परीक्षेत जतीनचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित प्राविण्य परीक्षेत जतीनचे यश
गणित प्राविण्य परीक्षेत जतीनचे यश

गणित प्राविण्य परीक्षेत जतीनचे यश

sakal_logo
By

89920
जतीन पाटील

गणित प्रावीण्य परीक्षेत जतीनचे यश
सावंतवाडी ः गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट, सावंतवाडी संचालित इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडेचा विद्यार्थी जतीन पाटील हा गणित प्रावीण्य परीक्षेत घवघवीत यश मिळवून प्रज्ञाशोध परीक्षेस पात्र ठरला. या यशाबद्दल शाळेच्या संचालिका मैथिली नाईक यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मुख्याध्यापक अजय बांदेकर यांनी पुढे होणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी गणित विषयाच्या सहाय्यक शिक्षिका श्रद्धा पायनाईक आदींचे मार्गदर्शन लाभले.
...............
आजगावात आज साहित्य कट्टा सभा
वेंगुर्ले ः आजगाव (सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्टाचा एकोणतिसावा मासिक कार्यक्रम उद्या (ता. १९) आजगाव वाचनालयात आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी पाचला होणाऱ्या या कार्यक्रमात ‘आवडलेली कादंबरी’ हा विषय असून विद्या विहार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उत्तम भागित हे व्यंकटेश माडगुळकर यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीबद्दल बोलणार आहेत. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच त्यावर चर्चा करण्यासाठी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.