Sun, March 26, 2023

मारुती बांदेकर यांचा
मळगाव येथे सन्मान
मारुती बांदेकर यांचा मळगाव येथे सन्मान
Published on : 18 March 2023, 11:01 am
89875
मळगाव ः मारुती बांदेकर यांचा सन्मान करताना माजी विद्यार्थी.
मारुती बांदेकर यांचा
मळगाव येथे सन्मान
सावंतवाडी, ता. १८ ः मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या १९९३-९४ दहावी बॅचतर्फे माजी शिक्षक मारुती बांदेकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. बांदेकर यांच्या निवासस्थानी काल (ता. १७) हा सन्मान सोहळा झाला. यावेळी जमलेल्या सवंगड्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी संदीप सामंत, रश्मी तेंडोलकर-भोगणे, सहदेव राऊळ, विवेक नार्वेकर, महेश पंतवालावलकर, गजानन राऊळ, एकनाथ खडपकर, संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.