देवरुखात २१ ला मूक पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरुखात २१ ला मूक पदयात्रा
देवरुखात २१ ला मूक पदयात्रा

देवरुखात २१ ला मूक पदयात्रा

sakal_logo
By

देवरुखात २१ ला मूक पदयात्रा
देवरूखः धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माकरिता आणि स्वराज्याकरिता सर्वोच्च बलिदान दिले. छत्रपती संभाजी राजांबद्दल अतीव कृतज्ञता म्हणून बलिदान मास पाळला जात आहे. छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने पकडून त्यांचा छळ केला. ११ मार्च १६८९ ला महाराजांनी देह सोडला. २१ मार्चला त्यांना धर्मप्रथेप्रमाणे, अतिशय आदराने आणि कृतज्ञतेने अग्नी दिला. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातर्फे २१ मार्चला मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वोच्च बलिदानाला विनम्र अभिवादन म्हणून देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकपासून सकाळी साडेआठ वाजता मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा शहीद स्मारकापासून सुरू होऊन मातृमंदिर चौक, माणिक चौक, एसटी स्टँड, शिवाजीचौक मार्गे पुन्हा मातृमंदिर चौक आणि परत शहीद स्मारक येथे येईल आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना उजाळा म्हणून संभाजीराजांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. सर्व शिवभक्त आणि संभाजीभक्त नागरिकांनी या बलिदान मासाच्या सांगतेसाठी मंगळवारी (ता. २१) मार्चला देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद स्मारक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
--------------
ratchl१८३.jpg
89899
चिपळूणः नवनिर्वाचित चेअरमन चंद्रकांत मांडवकर व व्हा. चेअरमन रावणंग यांचा सत्कार करताना पदाधिकारी.
----------
किसान पतसंस्था चेअरमनपदी मांडवकर
चिपळूणः चिपळूण तालुका किसान पतसंस्थेची २०२३ ते २०२८ या कालाधीसाठीची निवडणूक झाली. त्यानुसार पतसंस्थेच्या चेअरमनपदी चंद्रकांत मांडवकर तर व्हाईस चेअरमनपदी दीनानाथ रावणंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका माने यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली. सन १९८८ मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेची निर्मिती (कै.) बाळाराम उर्फ तात्या उदेग, अॅड. (कै.) शांताराम बुरटे, भाऊसाहेब बांद्रे, (कै.) गोविंदराव गजमल, (कै.) बाळशेठ खेराडे, (कै.) राक्षे गुरूजी, बेटकर यांच्या अथक प्रयत्नातून झाली. स्थापनेपासून संस्थेने पारदर्शक कारभाराची कास पकडून यशस्वी वाटचाल ठेवली आहे. पुढील पाच वर्षासाठी संचालक पदावर वसंतशेठ उदेग, विलास खेराडे, संजय तांदळे, सुहास चव्हाण, कृष्णाजी कोकमकर, प्रदीप काजारे, डॉ. ललिता गजमल, मृणाली कदम, वसंत हरवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
----------