Sat, March 25, 2023

हिर्लोक-सावंतवाडी बसची
काच अचानक फुटली
हिर्लोक-सावंतवाडी बसची काच अचानक फुटली
Published on : 18 March 2023, 3:02 am
89927
हिर्लोक-सावंतवाडी बसची काच फुटली.
हिर्लोक-सावंतवाडी बसची
काच अचानक फुटली
सावंतवाडी ः हिर्लोक-सावंतवाडी एसटी बसची काच अचानक फुटली. हा प्रकार आज दुपारी अडीचच्या सुमारास कोलगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. नेमकी काच कशी फुटली, हे चालकाला कळले नाही. कोणी तरी दगड मारला असावा किंवा झाडाची फांदी लागली असावी, असा संशय चालकाने व्यक्त केला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले; परंतु किरकोळ नुकसानी असल्यामुळे काही नोंद करण्यात आली नाही. याबाबत पोलिस हवालदार मनोज राऊत यांना विचारले असता त्यांनीही दुजोरा दिला. नेमकी काच कशी फुटली, हे त्या चालकालाच माहिती नाही. त्यामुळे याबाबत त्यांनी तक्रार दिली नाही, असे त्यांनी म्हटले.
.............